Saturday 2 April 2016

#Bharatmata_Ki_Jay


Wednesday 21 October 2015

शिवाजी राजे - चित्र


इंटेरीअर डिझायनिंग अर्थात वास्तू सजावट




आजकाल नवीन घर बांधताना किंवा Flat खरेदी करताना ऑफिससाठी दुकानगाळा खरेदी करताना सर्रास आढळणारी गोष्ट म्हणजे इंटेरीअर डिझायनिंग . पूर्वी असा असा काही प्रकार अस्तित्वात नसायचा , म्हणजे म्हणजे एखाद्या इंटेरीअर डिझायनर / आर्किटेक्ट कडून स्वत:च्या घराची/दुकानाची सजावट करून घेणे . त्यावेळी एकच केले जायचे , कि एखाद्या ओळखीच्या सुताराला येथे एक टेबल हवा, येथे एक बेड हवा, येथे भारतीय पद्धतीची बैठक (दिवाण) हवे, असे सांगून तो जे बनवून देईल त्यातच समाधान मानले जाई. पण कालांतराने त्यामध्ये बदल होऊ लागले . एखादे फर्निचर बनण्यापुर्वीच त्याची रचना कशी असेल किंवा ते झाल्यावर कसे दिसेल याचे ड्रोईंग बनू लागले . इथपर्यंतच्या कालावधीत फक्त फर्निचर केले म्हणजे वास्तूसजावट झाली असे मानले जायचे . पण पुढे यामध्ये पण प्रगती होत गेली व आजकाल इंटेरीअर डिझायनिंगमध्ये प्रत्येक प्रकारामध्ये विविध बारकावे समाविष्ठ होऊन गेले , उदा .- रेसिडेन्शिअल , कमर्शिअल , इण्डस्ट्रिअल  याप्रत्येक प्रकारांमध्ये त्या त्या वास्तुनुसार सजावटीमध्ये वैविध्य येऊ लागले . आणि फक्त फर्निचर पुरते मर्यादित असणाऱ्या वास्तू सजावटीमध्ये पि. ओ. पि. सिलिंग , टाइल्स फिटिंग , प्लंबिंग , इलेक्ट्रिकल वर्क , मोड्युलर किचन, पेंटिंग वर्क  असे विविध प्रकार समाविष्ठ होऊन गेले . 

अजूनही बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे कि , इंटेरीअर डिझायनिंग  खूप खर्चिक असतं . पण आपल्या बजेट मध्ये बसू शकेल असे बरेच पर्याय आज उपलब्ध असून त्याची पूर्वकल्पना आपल्या इंटेरीअर डिझायनरला आधीच दिल्यास व पैश्यांचे योग्य नियोजन करून आपल्याला आवडेल अश्या पद्धतीने देखील इंटेरीअर डिझायनिंग नक्कीच होऊ शकते . आणि ह्या ब्लॉगच्या मार्फत अधून मधून असेही काही सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडणारे पर्याय नक्कीच मांडले जातील . इंटेरीअर डिझायनिंग साठी लागणाऱ्या विविध प्रोडक्ट्चे इतके प्रकार आजकाल मार्केट मध्ये उपलब्ध आहेत , कि त्यातून आपल्याला आवडणारे , परवडणारे पर्याय आपण निश्चितच निवडू शकतो . 
सध्या इथेच थांबूया व पुढील पोस्ट मध्ये जाणून घेऊया कि इंटेरीअर डिझायनिंग सुरु करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी व साधारण कोणत्या गोष्टीना प्राधान्य दिले जावे .

अनिरुद्ध कलादालन आर्टवर्क


मराठी कॅलिग्राफी


बालाजी


Copyright © 2014 Preyas